Saturday, June 27, 2009

साबणाचा फुगा... फुटताना!

काही दिवसांपुर्वी कुठेतरी वाचलं,
"मला साबणाच्या पाण्याचा तो फुगा तर शार्प हवाच आहे पण तो फुट्त असतांनाची जी प्रोसेस आहे ती कॅमेरात पकडायची आहे" आणि मनात विचार सुरु झाले.

एकदा किल्ली दिली की आपलं काम सुरु... आणि तसं बर्‍यापैकी यशही आलं. त्यामुळे मी सध्या स्वतःवरच खुश आहे, त्याच नादात हे लिहायला घेतलं... त्यायोगे कोणाला फायदा झाला तर उत्तम!!

तर, माझा कॅमेरा, SONY CyberShot W55, तसा साधाच आहे, ज्याला point-and-shoot म्हणले जाते तसा. अशा प्रकारचे फोटो कसे काढता येतिल याबद्दल थोडा विचार केल्यावर खालील मुद्दे समोर आले. जरासं technical आहे, पण समजेल सगळ्यांना...

High shutter speed वापरावा लागेल, कारण,

  • फुगा फुटायची क्रिया १ मिलिसेकंदात होते त्यामुळे कॅमेराचा पडदा (shutter) देखिल फार फार थोड्या वेळासाठीच उघडा असायला हवा

  • माझ्या cybershot मधे ही सुविधा नाही :(



प्रकाश भरपुर लागणार, कारण,

  • कॅमेराचा पडदा फार फार कमी वेळ उघडा राहिला तर फार फार कमी प्रकाश फिल्म/CCD वर पडणार, फोटो अगदीच अंधुक येउ नये म्हणुन फुग्यावर तिव्र प्रकाश असण जरुरी आहे.

  • माझ्याकडे प्रखर कृत्रिम प्रकाश नसल्याने मी थेट सुर्यप्रकाशात फोटो घ्यायचं ठरवलं :)



Burst Mode वापरावा लागेल, कारण,
  • फुगा नक्की केंव्हा फुटणार हे मिलीसेकंदात सांगणे मुश्किल, म्हणुन आपण पटापट फोटो घेत राहायचे. हे काम burst mode करतो.

  • माझा कॅमेरा अगदीच साधा असल्याने burst mode मधे एका सेकंदात एक फोटो निघतो :( ... इस्से मेरा क्या होगा!! पण SONY च्या कॅमेरात multi-burst mode म्हणुन एक भानगड असते, या मोडमधे १/३० सेकंदाच्या अंतराने १६ फोटो घेता येतात... :) म्हणजे ३३ मिलिसेकंदात एक, कॅमेराचा पडदा अर्थातच त्याहुनही कमी वेळ उघडा असणार. पण यात एक compromise आहे. प्रत्येक फ्रेम ही ३२०x२४० पिक्सेल एवढीच असते :(



Manual focus वापरावा लागणार, कारण,

  • एरवी सगळे डिजीटल कॅमेरे ऑटो-फोकस करतात, पण हे फोकसिंग करण्यात थोडा वेळ जातो आणि साबणाच्या पारदर्शक फुग्यासारख्या गोष्टीत हे फोकसिंग गंडु शकत.

  • माझ्या कॅमेरात हे सेटिंग करणं शक्य होतं. :) मी ०.५ मिटरवर फोकस सेट करुन त्या अंतरावरच फुगा फोडायचं ठरवल.



ही बौद्धिक तयारी झाल्यावर वेळ आली प्रत्यक्ष प्रयोगाची.
कॅमेरा ... सेट,
लाइट... सेट,
अ‍ॅक्शन!

पण फुगवलेला फुगा कॅमेरापासुन ठरावीक अंतरावर फोडण आणि त्याच वेळी फोटो घेण हे काही जमेना.... मग ठरवलं फुगा फुगवतानाच फोडायचा... त्यायोगे फुगा फुटण्याची जागा आणि वेळ निश्चित झाली! मग मनासारखे फोटो यायला सुरवात झाली...

हे multi-burst मधे काढलेले (१६) फोटो कॅमेरावर एखाद्या स्लो मोशन फिल्म सारखे दिसतात, पण computer वर घेतले तर ती एकच jpg फाइल असते!



तर माझ्या अनेक प्रयत्नांपैकी सर्वात खास फोटो, (वरिल फोटोमधुन कापुन वेगळे केलेले)

फुटण्याआधी,



फुटताना,



फुटल्यानंतर,



हे तिनही फोटो १/३० सेकंद अंतरानी काढलेले आहेत.

माझा कॅमेरा वापरुन मी याहुन चांगले फोटो काढु शकत नाही. मला वाटत इथुनच पुढे फोटो काढणार्‍याच्या कलेचं (skill and creativity) महत्व कमी कमी होत जातं आणि कॅमेरा व इतर साधनांची उपयुक्तता वाढत जाते...

तुम्हाला काही भर घालायची असेल तर आनंदच होइल.
पुन्हा भेटुच!

---------------------------------------------------------------

Internet वर थोडा शोध केल्यावर मला या प्रकारचे फोटो gif फाइलमधे बदलण्याची एक साइट मिळाली!
http://www.multiburst.nl/converter_en.html

या साइटनी gif मधे बदललेला वरील फोटो, इथे पहा.

---------------------------------------------------------------

1 comment: